भोकर: पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे घेतली कोरोनासंदर्भात आढावा बैठक

रूग्णालयांची केली पाहणी, गरजूंना धान्य वाटप

मनोजसिंह चौहान

भोकर दि. ३ एप्रिल , -कोरोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासंदर्भात विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ३ एप्रिल रोजी भोकर तहसील कार्यालयात बैठक घेतली. ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर युनिटची पाहणी करून आरोग्य सुविधांसंदर्भात सूचना केल्या. त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या धान्याचे वाटपही त्यांच्या हस्ते गरजुंना करण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा ना. अशोकराव चव्हाण दररोज आढावा घेत प्रशासनास अनेक सूचना करीत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी शुक्रवारी भोकर शहर व तालुक्यातील कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रशासनास काही महत्वपूर्ण सूचना केल्या. यामध्ये प्रत्येक राशन कार्डधारकाला शासकीय योजनेप्रमाणे धान्याचे वाटप करणे, ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा गरजू व गरीब व्यक्तींना स्वयंसेवी संस्था आणि समाजातील दानशूर नागरिकांकडून संकलित करण्यात आलेल्या धान्याचे वाटप करण्यात यावे, शहर व तालुक्यातील नागरिकांना गरजेनुसार तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, कोरोनासदृश्य वाटणाऱ्या रूग्णांची तपासणी करून गरज भासल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात यावे, कोरोनाही राष्ट्रीय आपत्ती समजून प्रत्येक नागरिकाने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे आदी सूचनांचा समावेश होता.
यावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय, उपकार्यकारी अभियंता शिंदे, शाखा अभियंता शिंदे, अधिक्षक डॉ. अशोक मुंडे, कार्यकारी अभियंता तोटावाड मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, जगदीश पाटील भोसीकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, सुभाष पाटील किन्हाळकर, नागनाथ घिसेवाड, शेख युसुफ यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!