नांदेड : गुरुद्वारा बोर्डाची अहोरात्र लंगर सेवा ; लंगरसेवेने आता पर्यंत एक लाख नागरिकांना जेवण व साहित्य वितरण


नांदेड दि. 3 एप्रिल प्रतिनिधी – कोरोना मुळे उद्धभवलेल्या या आपात परिस्थितीत गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्था अहोरात्र नागरिकांच्या सेवेत समर्पित भावनेने कार्य करीत आहे. मागील पाच ते सहा दिवसांत येथील धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर साहेब बोर्डाच्या वतीने शहराच्या विविध भागात आणि गरजू लोकांना घरपोच लंगर दिले आहे. या कालावधीत बोर्डाने जवळपास एक लाख लोकांपर्यंत लंगर, सैनिटाइज़र इत्यादि साहित्य वाटले आहे.
मागील 25 मार्च पासून शहरात लॉक डाउन पाळले जात आहे. हजारोच्या संख्येत नागरिक उघड्यावर असून रोज बाहेरून येणाऱ्यांचे आवागमन वाढत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात आणि अनेक नागरांमध्ये नागरिक आपल्या घरात अडचणीत सापडलेले आहेत. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रम आणि सेवेतून शहरातील गरीब, गरजूं आणि उपाशी लोकांसाठी धाव घेतली. पहाटे चार वाजता पासून ते रात्री उशिरा पर्यंत लंगर तयार करने आणि विविध भागात पोहचविणे सुरु आहे. बोर्डाचे कर्मचारी वाहनं भरून जेवण सामग्री वेळेवर घेऊन नागरिकांपर्यंत पोहचत आहेत.
या कार्यात गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंघ मिनहास यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहेत. ते सतत स्थानीक गुरुद्वारा प्रशासन आणि सदस्यांच्या संपर्क साधून आहेत. तसेच उपाध्यक्ष गुरविंदरसिंघ बावा, सचिव रविंदर सिंघ बुंगाई, गुरुद्वारा बोर्ड सदस्य गुरुचरण सिंघ घड़ीसाज, गुरमीत सिंघ महाजन, भागिन्दर सिंघ घड़ीसाज, मनप्रीत सिंघ कुँजीवाले, सरदूल सिंघ फ़ौजी, जगबीर सिंघ शाहू, व्यवस्थापन समिति सदस्य देवेंद्र सिंघ मोटरावाले, गुलाब सिंघ कंधरवाले, नौनिहाल सिंघ जहागीरदार हे सेवा कार्याबद्दल अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा यांच्याशी संपर्क साधून आहेत. लंगर सेवेसाठी अवतार सिंघ पहरेदार, सुरिंदर सिंघ मेंबर, केहर सिंघ आणि इतर नागरिक सहभाग घेऊन लंगर वाटप करीत आहेत.
गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविंदर सिंघ वाधवा यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवारत आहे आणि शहरात मदत कार्यात मोलाचे योगदान देत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!