बऱ्हाळी : मुकुमाबाद येथे शिवसेनेच्या वतिने आयोजित शिबिरात ६० रक्तदात्यांची केले रक्तदान


बाऱ्हाळी दि. ०३ एप्रिल, वार्ताहर – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावला रोखण्यासाठी आज देशातील जवान व पोलीस यंत्रणा रात्रंदिवस आपली सेवा बजावित असताना यांच्या सुरक्षेतेसाठी आज शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने मुक्रमाबाद येथे सोशल डिस्टंसिन्ग चे पालन करीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६० रक्तदात्यानी रक्तदान केले.
आज देशात कोरोना व्हायरस नुसता थैमान घातल्याने नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. या विषारी व्हायरसला रोखण्यासाठी यावर खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान यांनी देशाला २१ दिवसाठी लॉकडाऊन केल्यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आज लॉकडाऊनचा १० वा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आज आपले भारतीय जवान सिमेवर कडक पाहारा देत आहे. याबरोबर देशातील पोलीस यंत्रणा व वैद्यकीय अधिकारी सुध्दा चौख सेवा बजावीत आहेत.
अशा संकट कालीन परिस्थितीत सुरक्षितता व जनता कर्तव्य म्हणून शिवसेना शाखा मुकमाबादच्या वतिने रक्तदान शिबीर घेण्यात आले. ८०% टक्के समाजकारण व २०% टक्के समाजकारण या उक्तीने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बालाजी पसरगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यबस्थानकावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संचार बंदी लागू असतानाही ६० रक्तदात्यानी रक्तदान केले.
यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन डॉ.जगदीश गायकवाड यांनी केले. तर सपोनि कमलाकर गड्डीमे, शिवशंकर पाटील, राहुल बलशेटृवार, मराठी पत्रकार संघाचे गंगाधर चामलवाड, विनोद आपटे, संतोष हेस्से , दादाराव गुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे मनोज जाधव, अतुल सुनेवाड, शिओम पाटील, राहुल इंदुरे , विजु पाटील, राज गुमडेसह जिवन ब्लड बँक नांदेड यांनी परिश्रम घेतले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!