नांदेड : अत्यावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या वाहनाच्या नूतनीकरणामध्ये ३० जून पर्यंत वाढ


नांदेड दि. ३ एप्रिल प्रतिनिधी – जिल्हा माहिती अधिकार नांदेड यांचे कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार नांदेड जिल्हयातील सर्व जनतेस कळविण्यात येते की, देशात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनामार्फत सुट देण्यात आली आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की, नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत मोटार वाहन कायदा, 1988 व केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 खाली अंतर्भूत असणाऱ्या कागदपत्रांच्या नुतनिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी उद्भवत आहेत. त्यान्वये शासनाद्वारे खालीलप्रमाणे निर्देश जारी करण्यात आलेले आहे.
मोटार वाहन कायदा, 1988 व केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 खाली अंतर्भूत असणारे कागदपत्रांपैकी ज्या कागदपत्रांची वैधता दि. 01.02.2020 नंतर अथवा दि. 30.06.2020 पर्यंत संपूष्टात येत आहे अशी कागदपत्रे दि. 30.06.2020 पर्यंत वैध गणली जातील. सर्व अंमलबजावणी यंत्रणानी अशी कागदपत्रे दि. 30.06.2020 पर्यंत वैध असल्याची ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!