नायगाव रुग्णालयातील रक्तदान शिबीरास खा.चिखलीकरांची भेट; कोरोना उपाय योजनेचा घेतला आढावा.


नायगावबाजार दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना वायरस मुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने नायगाव येथील वैद्यकिय अधिक्षक डाॅ आर.एच.गुटूरंकर यांच्या पुढाकारातुन नायगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन खा.प्रताप पाटील चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले.या वेळी तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे,माजी जि.प.सदस्य श्रावण भिलवंडे, माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, माजी जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार,राजेश पाटील हुस्सेकर,पो.नी.पडवळ गंगाधर कल्याण,रघुनाथ सोनकाबंळे, कैलास भालेराव,मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कोरोना चा मुकाबला करण्यासाठी तालुका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य साठी केलेल्या उपाय योजनेचा आढावा खा.चिखलीकर यांनी घेतला.त्याच्यां हस्ते सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांना सॅनिटायझर वाटप केले.या वेळी त्यानी रुग्णालयाची पाहणी केली
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय नायगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ एच. आर. गुंटूरकर, डॉ आर. एन. पोहरे , डॉ देवनीकर, पॅथॉलॉजिस्ट, डॉ नगराळे, डॉ, देशमुख , व प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी एस.पी.वाघमारे,कोंके. जि. एस. प्रयोग शाळा तंत्रज्ञ, बि. एस. धोपटे प्रयोग शाळा सहायक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या दौर्यात त्यांनी नरसी येथे ही भेट देवून कोरोना चा मुकाबला करण्यासाठी केलेल्या नियोजनाला आढावा घेतला .या प्रसंगी जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, माजी जि.प.सदस्य श्रावण भिलवंडे,सपोनी सोमनाथ शिंदे, सरपंच प्रतिनिधी गजानन भिलवंडे,मोहन भिलवंडे, मारुती भिलवंडे सह मान्यवर उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!