लोहा : शिवसेनेचे बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांच्या वतीने निराधार गरजुवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


लोहा दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली आहे शिवसेनेने गरजुवंतांना मदत करण्याची भूमिका घेतली . लोहा कंधार मतदारसंघात बाळू पाटील कऱ्हाळे लोकांच्या मदतीला धावले आहेत .जुन्या लोह्यात सत्तर हुन अधिक कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्यानंतर मोलमजुरी करणाऱ्यांची उपासमार होते आहे . शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मदतीला शिवसैनिक धावून जातील असे सांगितले त्या आदेशाचे पालन लोहा-कंधार मतदारसंघात युवा कार्यकर्ता बाळासाहेब पाटील कऱ्हाळे हे करीत आहेत. शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर ,खासदार हेमंत पाटील संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , जिल्हाप्रमुख आनंदराव बोढारकर, यांच्या मार्गदर्शनाखाली लॉक डाऊन च्या काळात बाळासाहेब कऱ्हाळे व त्यांचे सहकारी लोकांना जमेल तशी मदत करीत आहेत
जुन्या लोह्यातील 70 हुन अधिक कुटुंबियांना पोलीस निरीक्षक भागवत जायभाये ,माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक छत्रपती धुतमल, युवा नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात साखर, पत्ती, तांदूळ ,मीठ ,मिरची, मुरमुरे ,मसुरची डाळ अशा वस्तू देण्यात आल्या .या वेळी माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल तालुकाप्रमुख संजय ढाले ,शहर प्रमुख मिलिंद पवार ,अंगद केंद्रे, चंद्रकांत पाटील आडगावकर ,गजानन गुंट्टे, महेंद्र तेलंग , अनिल धुतमल, गणेश बगाडे, अमन शेख, विठ्ठल महाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती .सोशल डिस्टन्स चा नियम पाळत ही मदत शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यापूर्वी बाळू पाटील यांनी भटक्यांच्या पाल वस्तीवर कंधार व अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत लोकांना दिलासा दिला आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!