सावधान : राज्यात दिवसभरात ८१ नवे करोना रुग्ण; एकूण आकडा ४१६ वर: आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

मुंबई दि. २ एप्रिल, प्रतिनिधी – राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहिती नुसार आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं करोना रुग्णांचा आकडा ४१६ वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत ४२ जण करोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे,
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मुंबईत ५७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. तर पुण्यात ६, पिंपरी-चिंचवडमध्ये ३, अहमदनगरमध्ये ९, ठाण्यात ५ आणि बुलडाण्यात एकाला करोनाची लागण झाली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!