राज्यसभेच्या नवीन खासदारांनी शपथविधीसाठी प्रतीक्षा करावी — राज्यसभा सचिवालय


५५ पैकी ३७ सदस्यांची बिनविरोध निवड; शरद पवार ,रामदास आठवले पुन्हा खासदार


कमलेश गायकवाड


नवी दिल्ली दि. 2 एप्रिल — राज्यसभेच्या ५५ रिक्त होणाऱ्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती. काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक पार पडली . यातून ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. कोविड १९ मूळे २१ दिवसांची ताळेबंदी करण्यात आली. यामुळे अन्य ठिकाणी होणारी निवडणूक पुढे ढकळण्यात आली.आता नव्या खासदारांनी शपथ विधीसाठी प्रतीक्षा करावी असे राज्यसभा सचिवालयाने कळवले आहे.
महाराष्ट्र राज्यातून नव्याने ७ खासदार निवडून आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांचा समावेश आहे. कांग्रेसचे राजीव सातव ,शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी,भाजपचे उदयनराजे भोसले आणि डॉ भागवत कराड निवडून आले. भाजपने पाठींबा दिलेले पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रातील सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले हे बिनविरोध निवडून आले. जुन्या खासदारांचा कालावधी आज रात्री १२ वाजता संपणार आहे. यामुळे नवे खासदार उद्या पासून केंव्हा ही शपथ घेऊ शकतात . पण देशात २१ दिवसाची ताळेबंदी आहे. परिवहन साधनं बंद आहेत.काही जण दिल्लीत असतील. असे असले तरी शपथविधीसाठी प्रतीक्षा करा असे राज्यसभा सचिवालयाने कळवले.
नव्या खासदारांचा शपथ विधी झाला नसला तरी त्यांना ज्या सुविधा मिळत असतात त्या मिळत राहतील असे राज्यसभा सचिवालयाने कळवले.ऐकून १७ राज्यातील ५५ खासदार निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. आता ५५ पैकी ३७ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत .मध्ये प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि इतर ठिकाणी निवडणूक व्हायची आहे.
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार राज्यघटनेतील कलम ९९ आणि सभागृह कामकाज नियम ५ नुसार नव्या खासदारानी केंव्हा पर्यंत शपथ घ्यावी याचा स्पष्टपणे उल्लेख नाही. कायदा आणि विधी मंत्रालय खासदाराच्या सुविधा बाबत लक्ष देत असते. नव्या खासदाराना शपथ घेतली नाही तरी सोयी आणि सुविधा मिळतील असे राज्यसभा सचिवालयाने कळवले आहे.
आज मध्य रात्री म्हणजे 2 तारखेला महाराष्ट्र राज्यातील ७ सदस्य सेवा निवृत्त होत आहेत. यात शरद पवार ,माजीद मेनन ,कांग्रेसचे हुसैन दलवाई शिवसेनेचे राजकुमार धूत भाजपचे अमर साबळे ,भाजप समर्थक अपक्ष खासदार संभाजी काकडे आणि भाजपचा पाठींबा असलेले रामदास आठवले याचा समावेश आहे. शरद पवार आणि रामदास आठवले पुन्हा निवडून आले आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!