लोहा : आम जनतेची पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची मदत


नगरसेवक दता वाले यांचा पुढाकार


लोहा दि. १ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आहवानाला साथ देत त्यांचे निष्ठावंत सहकारी लोह्याचे नगरसेवक दत्ता वाले यांनी आपल्या वार्डात लोकांना मदतीचे आवाहन केले आणि जमत तसे सहकार्य करत ५१ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आले विशेषतः यात मजुरदारांचा सहभाग आहे
कोरोना विषाणू पीडितांवर उपचारासाठी आपण जमेल तसेसहकार्य केले पाहिजे. ‘सबका साथ ‘ कोरोना चा होईल नायनाट ‘..असा विचार रोजंदारी करणाऱ्या सह मध्यमवर्गीय, नोकरदार, व्यापारी ,असा सर्वांचाच झाला आहे लोहा नगरपालिका क्षेत्रातील वार्ड एक भागाचे दत्ता वाले हे नगरसेवक आहेत. खा प्रतापराव पाटील यांचे खंदे निष्ठावंत समर्थक आहेत
नगरसेवक दत्ता वाले यांचे वैयक्तिक 21,000/- रुपये प्रभाग क्र 1 मधील सायाळ रोड परिसरातील मजुरदार नौकरदार, छोटे मोठे व्यापारी, जागरूक नागरिक यांनी जमेल तेवढी मदत पंतप्रधान सहाय्यता कोष साठी जमा केली ती 30,000/- रुपये जमा झाली . एकूण 51,000/- रुपये नगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदत निधी अकाऊंट चा डी.डी काढण्यात आला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकवर्गणीचा हा धनादेश उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांच्या कडेसुपूर्द केला जाणार आहे नगरसेवक दत्ता वाले प्रा.राजेश गोरे,बाळू भाऊ बोनागिरे,नागोराव शेटे,गजानन नाईकवाडे,अनिकेत जाधव,पवन सगर, व इतर नागरिक यांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे ..शासकीय योजनेवर स्वप्रसिद्धी करणारे एकीकडे तर दुसरीकडे आपल्याला घडेल तेव्हढे पैसे पंतप्रधान सहायता निधीला देणारे नगरसेवक व सामान्य नागरिक अशी चर्चा सोशल मीडियात यानिमित्ताने अनुभवायला मिळाली

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!