लोह्यात स्व कष्टातून गरजवंताला अन्नदान; माळाकोळीत गरिबांना नगदी स्वरूपात मदत…


लोहा दि. ३१ मार्च , तालुका प्रतिनिधी – वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात टाळेबंदी आहे.गरजवंत -गरीब कुटुंबीयांना मदतीसाठी कोणताही गाजावाजा न करता सेवाभावे शहरात पुढाकार घेतला जातो आहे .स्वकष्टातुन अन्नदान -आर्थिक मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. काहीजण शासनाची मदत वाटप करत आहेत व प्रसिद्धीचा खटाटोप केला जात आहेत …. शासकीय मदतीत स्व प्रसिद्धी तर स्व कष्टाने मनोभावे दानधर्म अशी सामाजिक बांधिलकीची विसंगती समोर आली आहे.
लोह्यातील अखंड वसुंधरा सेवा संकल्प या संस्थेचे प्रमुख स्वच्छतादूत शिक्षक राजू तिडके , एव्ही इन्फोटेक संगणक इन्स्टिट्यूट चे प्रमुख विठ्ठल पांचाळ श्रीनिवास भुताळे चंद्रकांत नाईके अनिरुद्ध तिडके युवा कार्यकर्ते श्रीकांत पाटील पवार यांनी ग्रामीण रुग्णालयातील रूग्णाची जेवणाची व्यवस्था केली स्वकष्टातून हा सेवा त्यांनी कोणताही गाजावाजा न करता केली ..रुग्णांना अन्नदान केले .हे करणारी सगळी मंडळी कष्टमय जीवनाचा अनुभव असलेली त्यामुळेच त्यांनी टाळेबंदीत रुग्णालयात अन्नदान केले
माळाकोळी येथील जागरूक नागरिकांनी एकत्रित आले आपल्या प्रपंचातील जमेल तेवढे पैसे त्यांनी गोळा केले ..गरीब -मजूरदार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली पाहता आशा ३३कुटुंबांना या दानशूरांनी अकराशे रुपये प्रत्येकी दिले.. पण ही मदत करताना त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही .परिस्थिती जेमतेम पण मनाची श्रीमंती असणाऱ्यांनी अडचणीत माणसांना माणुसकी दाखवली.
अनेक ठिकाणी रस्त्यावर सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना जेवणाची सोय केली जात आहे अनेक दान शूर केलेली मदत जाहीर करीत नाहीत पण शासनाच्या उपक्रमांना स्वतः आपणच राबवित आहोत ..असे बसवून सोशल मीडियात अनेकजण स्व प्रसिद्धी करीत आहेत ..मनाचा मोठेपणा दाखवत आजच्या कोरोना परिस्थितीस्वतःच्या खिशाला झळ पोहचू न देता शासकीय योजनेच्या माध्यमातून स्वतः चा उदोउदो करण्यात धन्यता मानली जाते आहे ..एकीकडे आपल्या कष्टाने सेवाभावी काम करणारे आणि दुसरीकडे शासनाच्या योजनेचा स्वप्रसिद्धीसाठी फायदा घेणारे अशी सामाजिक बांधिलकी या निमित्ताने समोर आली आहे..

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!