लोह : इतिहास साक्षी भीमपुरुष भीमराव कोकरे यांचे १०० व्या वर्षी निधन

लोहा दि. ३० मार्च तालुका प्रतिनिधी -भारतरत्न तथा संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण अंत्य याञेस (६ डिसेंबर १९५६) उपस्थित असलेले इतिहास साक्षी भीमपुरुष भीमराव संभाजी कोकरे यांचे वृद्धोपकाळात वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले .सिडको नांदेड येथे संभाजी चौक स्मशान भूमीत सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात राष्ट्रपाल , शिद्बोधन व बसपा चे मराठवाडा झोन चे माजी प्रभारी राहुल कोकरे असे तीन मुलगे, दोन मुली, पत्नी नातवंडे असा मोठा परिवार आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!