लोह :सव्वाशे भटक्या कुटुंबाला व्यापारी असोसिएशची धान्य स्वरूपात मोठी मदत


लोहा दि. ३० मार्च तालुका प्रतिनिधी – तालुका प्रशासन जीवाची परवा न करता कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत लोहा शहरातील भटक्यांच्या पाल वस्तीवर सव्वाशे कुटुंबाला व्यापारी असोसिएशन च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे तहसीलदार विठ्ठल परळीकर नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार चंद्रकांत दमकोंडवार यांच्या पुढाकाराने नाथ गोसावी वैदू घीसडी कैकाडी पाथरवट अशा 125 कुटुंबांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पाल वस्तीवर तहसीलदार विठ्ठल परळीकर नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले
भटक्या विमुक्ताचे नेते प्रा डॉ संजय बालाघाटे, कृषी अधिकारी देवानंद सांगवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार चंद्रकांत दमकोंडवार बालाजी जाधव महादेव ससाने भीमराव जोंधळे आदी उपस्थित होते
.मांग गारुडी, पोतराज, पारधी,, नंदीवाले नाथ गोसावी कैकाडी ,खिसडी चाळणीवाले फुगेवाले, वैदू अशा 125 कुटुंबियांना ही मदत देण्यात आली

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!