लोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जंतुनाशक फवारणी


लोहा दि. ३० मार्च तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोहा तालुक्यातील सर्व म्हणजे 118 ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावांची जंतुनाशक धूर फवारणी केली जात आहे येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती सभापती आनंदराव पाटील व गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी दिली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाला पंचायत समिती सहकार्य करीत आहे सभापती आनंदराव शिंदे उपसभापती नरेंद्र गायकवाड व सर्व पंचायत समिती सदस्य यांनी गावोगावी धूळ फवारणी व जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचनागट विकास अधिकारी यांना केल्या होत्या सर्व तालुक्यातील गावोगावी वाडी तांडा यावर जंतुनाशक फवारणी करण्याचे काम सुरू आहे अर्ध्याहून अधिक गावात चे झाले असून येत्या दोन-तीन दिवसात उर्वरित गावात ही पूर्ण होईल अशी माहिती सभापती पाटील यांनी दिली .
.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!