नायगाव शहरात देशी व विदेशी दारूची दुप्पट दामाने विक्री.


नायगावबाजार, दि.२९ मार्च तालुका प्रतिनिधी -कोरोनाच्या धास्तीने सारेजग हादरले असताना आणी लाॅक डाऊनच्या काळात उपाशी तापासी कष्टकरी मजुरां सह अन्य नागरिकांना दानशुर मंडळी अन्न धान्याचे वाटप करून आपले कर्तव्य बजावत माणुसकी जपत असताना नायगाव शहरातील काही नफेखोरी लालची बिअर बार व परमीट रूम चालकांनी या बंदच्या काळात दाम दुपट किंमतीने विदेशी दारू ची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु करून लोकांची लुट चालवली आहे.
या बंदच्या काळात देशी दारूचा दाम आता विदेशी च्या वर गेला आहे. विशेष म्हणजे नायगाव शहरात एलसीबीची धाड पडल्या नंतर सील ठोकल्या नंतर ही ही विक्री खुलेआमपणे चालू आहे.लाॅक डाऊन ला एका सप्ताहाचा कालावधी उलटला.या बंदचा फायदा काही बार मालकानीं आणि देशी दारू ची विक्री करणार्या लोकांनी आपल्या हस्तक्षेप करवी घ्यायला सुरवात केली आहे.नायगाव शहरात देशी दारू ची काॅटर १५० रूपयांस विकली जात असून विदेशी दारू प्रती काॅटर ३०० ते ३५० रूपयांस सर्रास विकली जात आहे.या सर्व विक्री प्रकारास उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्याचे पाठबळ असल्याने हा सर्व विक्री चा प्रकार खुलेआमपणे चालू आहे.काही सवयी अधिन गेलेल्या तळीरामाला अशा पध्दतीने त्यांची लुट चालवली आहे.
या प्रकाराची दखल जिल्हा पोलीस अधिक्षकानीं घ्यावी व लाॅक डाउनच्या काळात चढ्या भावाने दारू ची विक्री करणार्या परमिट रुम धारकावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!