कोरोना सुरक्षा,नायगाव शहरातील भाजीपाला दुकाने मोढ्यात स्थलांतर.


नायगावबाजार, दि.२९ मार्च , तालुका प्रतिनिधी – नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेली भाजीपाल्याचे दुकाने पोलीस व नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोन समोर ठेवून बाजार समिती व सार्वजनिक बाधंकाम उपविभागीय विभागाच्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत केले आहेत.
नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करू नये सुरक्षित अंतर ठेवून वावर करावा असे आव्हान उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, कार्यलयीन अधिक्षक संतराम जाधव यांनी केले आहे.पुर्वी सदर भाजीपाल्याचे दुकाने शहरातील मुख्य डाॅ हेगडेवार व छत्रपती शिवाजी या मुख्य चौकात होते.या ठिकाणी खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
मागील सप्ताहात पासून लाॅकडऊन सुरू असून शहरात किराणा,भाजीपाला व दुध विक्री ची दुकाने चालू असून बाकी सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत.नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस निरीक्षक पडवळ सह ठाण्यातील पोलीस बाधंवानी चौका चौकात खडा पहारा देत घरा बाहेर नागरिक पडणार नाहीत याची काळजी घेत आहेत.
शहरातील नागरिक सकाळी सकाळी भाजीपाला ,किराणा व औषधी दुकानावर खरेदी साठी गर्दी होताना दिसत आहे.एरवीमात्र रस्त्यावर सन्नाटा असतो.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!