पूर्णा येथील कर्तुत्ववान महिला मुख्याध्यापिका आत्तीया बेगम यांचे समाज, संघनांकडून कार्य दुर्लक्षितच


पूर्णा दि.9 मार्च, तालुका प्रतिनिधी- पूर्णा येथील जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका कुमारी आत्तीया बेगम यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर गेल्या वीस वर्षापासून मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून या काळात त्यांनी अनेक डॉक्टर, इंजिनीअर, वकील असे गुणवंत विद्यार्थी घडविले . महिलादिनी अशा महिला मुख्याध्यापकांचा गौरव व्हावा अशी अपेक्षा असतांना मात्र अशा कर्तुत्ववान महिलेचा विविध समाज संघटनांना मात्र सपशेल विसर पडला आहे. त्यांचा या शिक्षणक्षेत्राच्या योगदानासाठी यथोचित सन्मान व्हावा अशीअनेक माजी विद्यार्थी व समाजसेवकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अत्यंत शिस्तप्रिय आतीया मॅडम यांना कामाचा कंटाळा कधी येत नाही . विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत तत्पर असतात. अनेक विद्यार्थ्यांना सहकार्य करतात. त्यांनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता हे कार्य केले असून पुर्णा वासियांना त्यांच्या कार्याचा गौरव आहे त्यांच्या कार्यकाळात शाळा कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे मुख्याध्यापिका आत्तीया मॅडम गौरव व्हावा अशी अपेक्षा माजी विदयार्थी व इतरांकडून होत असून सध्या 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून येथे इंग्रजी माध्यमाची शाळा असून पूर्णा येथे उत्कृष्ट प्रकारे कार्य करीत आहेत. शाळा संस्थेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वाघमारे सचिव काबरा हे त्यांना नेहमीच कामासाठी सहकार्य करीत राहतात.

Share this news

One thought on “पूर्णा येथील कर्तुत्ववान महिला मुख्याध्यापिका आत्तीया बेगम यांचे समाज, संघनांकडून कार्य दुर्लक्षितच

  1. Yes is a very a Successful H.M and very good human being , all time to work and very Strick at school and students

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!