बुध्दिमतांम वरीष्ठम राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मतिथी निमित्य लेख महाराष्ट्र अठरापगड विचारांनी  रांगड्या वृत्तींनी आणि भावभक्तिच्या सुगंधाने ओथंबलेली…

वेळ गेलेली नाही, घरात राहणेच सर्वोत्त उपाय

आर. के. सिन्हा माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समस्या त्याची पाठ सोडत नाहीत. आपल्यापैकी बहुतांश लोक या विधानाशी सहमत असतील याची खात्रीच नव्हे तर विश्वास आहे. या समस्यांच्या समाधानासाठी सहकारी, मित्र, नातेवाई, पैसा आणि वेळ यांची साथ आवश्यक असते. अशीच करोना विषाणूची समस्या भारतीयांसह संपूर्व जगावर मृत्यूची कराल दाढ बनून उभी ठाकली आहे. संपर्कातून होणारा संसर्ग यामुळे दिवसेंदिवस जगात करोना विषाणू मृत्यूचे तांडव करीत आहे. परंतु, तुम्ही-आम्ही जर निर्धाराने आत्मशिस्त अंगी बाळगल्यास आपण या संकटावर लिलया मात करू शकतो. “अवतीभवती जाळण्यासारखे काहीच नसले तर पेटलेली काडी देखील आपोआप विझून जाते”  हे आपण लहानपणापासून अनुभवत आलोय. आजवर जे पाहिले, अनुभवले त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण जर घराबाहेर पडलोच नाही तर करोनाच्या प्रादुर्भावाचा धोका अनेक पटीने कमी होणार आहे. हे लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. ही घोषणा अनेकांना शिक्षा वाटत असली तरी करोना विरोधातील लढ्यामध्ये आपल्या हाती तुर्तास तेवढेच एकमेव आणि प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. त्यासाठी 130 कोटी लोकांच्या सामूहिक निर्धाराची गरज आहे. कारण आपल्या सहकार्याच्या समिधेविना राष्ट्रसुरक्षेचा हा यज्ञ पूर्णत्वास जाऊ शकत नाही.  पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलेल्या संदेशात नमूद केल्यानुसार सध्याच्या घडीला देश‘‘न भूतो न भविष्यति’’ अशा संकटाला सामोरे जातोय. या संकटात जर आपण 21 दिवस घरात राहून संयम आणि धैर्य राखले नाही तर देशाची 21 वर्षांसाठी पिछेहाट होईल असा इशारा पंतप्रधानांनी दिलाय. मोदींचे हे विधान अभ्यास, अनुभव आणि सत्यावर आधारित आहे. त्यामुळे त्यांनी देलेल्या सूचनेकडे तसूभरही कानाडोळा करून चालणार नाही. अशा प्रकारचे लॉकडाऊन फक्त भारतात केले जातेय अशातला भाग नाही. तर करोना विषाणूच्या संकटाचा सामना करणा-या स्पेन, अमेरिका आणि इटली या देशांनी देखील चीनच्या धर्तीवर लॉकडाऊन करण्याचा पर्याय निवडला आहे. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” या उक्तीनुसार आम्ही भारतीयांना देखील याचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत जागतिक पातळीवर दुसरा क्रमांक पटकावणा-या इटली सारख्या देशाला सुद्धा लॉकडाऊनचाच पर्याय निवडावा लागला आहे. त्यामुळे भारतात लॉकडाऊन किती आवश्यक आहे याची कल्पना येऊ शकते. केवळ लॉकडाऊनच असा मार्ग आहे ज्यामुळे आमचा एकमेकांशी होणारा संपर्क आणि त्यातून होणारा संभाव्य संसर्ग याला आळा घालता येऊ शकतो. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितल्यानुसार लॉकडाऊनमुळेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव थोपवता येईल. अमेरिका आणि युरोपिय देशांच्या तुलनेत आमच्याकडे लोकसंख्येची दाटी प्रचंड आहे. त्यामुळे अजाणतेपणे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका देखील तितकाच भयावह आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शृंखला खंडीत करण्यासाठी आमचा एकमेकांशी होणारा संपर्क आटोक्यात येणे अतिशय आवश्यक आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जगात 67 दिवसात करोना विषाणूमुळे सुमारे एक लाख लोक संक्रमित झालेत. तर केवळ 11 दिवसात या एक लाख लोकांनी आणखी एक लाख लोकांना संसर्ग झाला. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात आणखी एक लाख लोकांना करोनाचा प्रादुर्भाव झाला. अशा प्रकारचे करोना विषाणूचा फैलाव होत राहिला तर भविष्यातील चित्र भयावह असेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव थोपवणे अतिशय आवश्यक आहे. चीनच्या वुहान शहरात करोना विषाणूचा प्रभाव निदर्शनास आल्यानंतर भारताने आपल्या नागरिकांसह भुटान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीवच्या नागरिकांचीही सुटका केली होती. त्यांना गुडगांव येथील आयटीबीपीच्या आयसोलेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. तब्बल 14 दिवसांच्या आयसोलेशन कॅम्पमधील वास्तव्यानंतर हे लोक बरे होऊन आपापल्या घरी परतलेत. परंतु, जगभरातून भारतात येणाया प्रवाशांना आयसोलेशन कॅम्पमध्ये न पाठवणे ही आमची सर्वात मोठी चूक ठरली. करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. करोनाची लागण झाल्याचे लक्षात येण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. कधीकधी 10 दिवसांनी देखील याची लक्षणे दिसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरोग्य तपासणीनंतर विलग न करता घरी जाऊ देणे हीच आमची सर्वात मोठी चूक ठरली. त्यामुळे महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड सारख्या राज्यांमध्ये करोना विषाणूचे संक्रमण वाढत गेले. पंतप्रधानांनी गेल्या 24 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. काही लोक या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडेल असे सांगताहेत. परंतु, जीवंत राहिलो तरच अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टींवर चर्चा आणि उपाययोजना करता येऊ शकतील ही गोष्टच काही लोगांच्या पचनी पडत नाही. काही लोक हातावर पोट असलेल्या श्रमजीवी वर्गाची चिंता करताना दिसून येतात. लॉकडाऊनमुळे या लोकांचे काय होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. परंतु, यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्टी लक्षात घेतली पाहिजे की, देशभरातील कामगार वर्ग दिवाळी आणि इतर सणांसाठी आपापल्या गावी जात असतो. बरेच लोक दोन ते तीन आठवडे कामवर परतत नाहीत. त्यामुळे हा संकट काळ अशाच प्रकारचा आहे असे समजून आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासोबतच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याची तक्रार करणा-या  लोकांना  देखील आपल्या परिवारासोबत राहण्याची आयती संधी या लॉकडाऊनमुळे चालून आलीय. त्यामुळे आपण या काळात आपल्या कुटुंबियांना भरपूर वेळ देऊ शकतो. त्यांच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने संवादी होऊ शकतो याचा देखील विचार केला पाहिजे. यासोबतच केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय. त्यामुळे हातावर पोट असलेल्या दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवन या संकट काळत काहीसे सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. वाराणसीच्या नागरिकांशी संवाद साधताना 25 मार्च रोजी पंतप्रधानांनी म्हंटले होते की, महाभारताचे युद्ध पांडवांनी 18 दिवसात जिंकले होते. करोनाच्या विरोधातील युद्धात आम्हाला 21 दिवसांचा संघर्ष करावा लागणार आहे. या युद्धात देशाची 130 कोटी जनतेकडे नेतृत्त्व असून संयम, सबुरी आणि आत्मनिग्रह यातून आम्ही हे या संकटाचा सामना करू शकतो नव्हे करतो आहे आणि विजयी देखील होऊ हे नक्की ! (लेखक ज्येष्ठ संपादक व स्तंभ लेखक आहेत)

तख्त सचखंड चा होळी महोत्सव ; भक्ती आणि सामाजिक मूल्यांची सांगड

— शीख समाज हा धार्मिक मूल्य आणि सामाजिक मूल्यांच्या निर्वाचन करणारा देशातील एक महत्वपूर्ण असा मानव…

हजुरसाहेबचा ‘धार्मिक पर्यटन’ योजनेअंतर्गत विकास करावा

नवीन विकास आराखडा तयार करावा श्री हजुरसाहेब नांदेड धार्मिक आणि ऐतिहासिक नगर असल्याने आणि दिवसंदिवस येथे भाविक आणि पर्यटकांच्या…

error: Content is protected !!