महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आवाहन

                     

परभणी, दि. 27 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पायलट टेस्टींग करिता परभणी जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी येथील ( ६२८ ) व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ( ९६ ) शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या याद्या दिनांक २४  फेब्रुवारी २०२० रोजी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत व सदरील यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण देखील सुरु झालेले आहे . परभणी जिल्ह्यात एकूण ( १३२१ ) आपले सरकार / CSC केंद्रामार्फत आधार प्रमाणीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे . तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेची दुसरी यादी दि. २८ फेब्रुवारी २०२० पासून पोर्टलवर प्रसिध्द होणार आहे , पोर्टलवर याद्या जसा जशा प्राप्त होतील  तसेच सदरच्या प्रसिध्दी केलेल्या याद्या प्रशासनाकडून , बँकांकडून बँक शाखा , ग्राम पंचायत कार्यालय , आपले सरकार सेवा केंद्र , CSC सेंटर्स येथे लावण्यात येतील . शेतकऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक , बँक बचत खात्याचे पासबुक , आधार कार्ड , आधार कार्डशी संलग्न मोबाईल फोन घेऊन गावातील आपले सरकार सेवा केंद्र , CSC सेंटर येथे जावे. आधार प्रमाणीकरण करतेवेळी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक , थकबाकीची रक्कम बरोबर आहे का हे तपासावे . सदरची माहिती बरोबर असल्यास मान्य हा पर्याय निवडावा . त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकन्याच्या बँक खात्यावर जमा होईल . जर आधार क्रमांक किंवा थकबाकी ची रक्कम चूकीची असल्यास अमान्य हा पर्याय निवडावा . शेतकऱ्याने अमान्य हा पर्याय निवडल्यानतंर त्यास त्याच्या तक्रारीची पावती मिळेल शेतकऱ्याने ती पावती जतन करुन ठेवावी , त्यानतंर सदरचे खाते पुढील कार्यवाहीस्तव जिल्हा समितीकडे येऊन तात्काळ कार्यवाही केली जाईल . तसेच शेतकऱ्यांनी आधार प्रमाणकीकरणास जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या बैंक शाखेत जाऊन    दि . ३० सप्टेंबर , २०१९ पर्यतची थकीत पिक कर्जाची मुद्दल व व्याज मिळून होणारी एकूण रक्कम लिहून घ्यावी . ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज खात्यास अद्याप पर्यत आधार क्रमांक लिंक केलेला नाही त्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्यास लिंक करावा तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे . आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय योजनेचा लाभ शेतकन्यांना मिळणार नाही . सदरचे आधार प्रमाणीकरण हे विनामुल्य केले जाणार आसून त्यासाठी कुठलेही शुल्क देण्याची आवश्यकता राहणार नाही . त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्ज मुक्तीच्या याद्या प्रसिध्द झाल्यावर आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी डी . एम . मुगळीकर ,  औरंगाबाद विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे  यांनी केले आहे. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी कळविले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!