पुणे महापौर कबड्डी: महिलांमध्ये शिवशक्ती मुंबई संघाने तर पुरूष गटात बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने पटकाविला महापौर चषक


महिलांची अंतिम लढत ठरली लक्षवेधी तर पुरूष गटातील अंतिम सामना झाला एकतर्फी


पुणे दि.27, विशेष क्रिडा प्रतिनिधी- पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅडवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला खुले गट महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे तर पुरूष विभागात बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन या संघाने तर महिलांमध्ये शिवशक्ती मुंबई संघाने महापौर चषकावर आपले नाव कोरले. महिलांच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने सुवर्णयुग स्पोर्टस् संघावर 36-32 असा विजय मिळविला. हा सामना अपेक्षे प्रमाणे झाला. हा सामना निर्धारीत 28-28 गुणांवर संपला. यानंतर हा सामना पाच पाच चढायांवर खेळविण्यात आला. यामध्ये शिवशक्ती संघाच्या रेखा सावंत व ऋतुजा बांदवेकरने त्यांचे क्षेत्ररक्षण भेदत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पाच पाच चढायांच्या मध्ये शिवशक्तीच्या ऋतुजा बांदवडेकरने तीन गुण मिळविले तर रेखा सावंत हिने दोन गुण मिळवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सुवर्णयुगच्या प्रतिक्षा निवंगुणेने शिवशक्तीच्या ऋतुजा बांदवडेकरची पकड करण्याच्या प्रयत्नात 3 गुण गमावल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मध्यंतराला 10-11 असा शिवशक्ती संघ पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर ज्योती डफळ व रेखा सावंत यांनी चांगल्या चढाया केल्या तर त्यांना ऋतुजा बांदवडेकरने चांगली साथ दिल्याने हा विजय मिळविणे शक्य झाले. सुवर्णयुगच्या स्वाती खंदारे हिने चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. तर तीला प्रतिक्षा निवंगुणे व हर्षदा सोनवणे हिने घेतलेल्या नेत्रदिपक पकडी ह्या निर्णायक ठरल्या मात्र त्यांना शेवटच्या क्षणी विजयाने पाठ दाखविली. पुरूषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघाने मुंबईच्या विजय क्लब संघावर अपेक्षेप्रमाणे 40-17 असा सहज विजय मिळविला. सुरवातीपासुनच दोन्ही संघ आपल्या नावलौकिका प्रमाणे खेळ करणार हे अपेक्षित असल्याने दोन्ही संघानी सुरवातीपासुनच सावध खेळ करण्यास सुरवात केली. यानुसार पहिल्या दहा मिनिटातच बाबुराव चांदेरे फौंडेशनच्या स्टार खेळाडू सिध्दार्थ जाधव व अक्षय जाधव यांच्या चौफेर चढाया व विकास काळे आणि निखिल ससार यांनी केलेल्या महत्त्वपुर्ण पकडीच्या जोरावर लोण लावला. त्यानंतर मात्र बाबुराव चांदेरे संघाने आपले आक्रमण वाढवत सामना एकतर्फी केला. मात्र विजय क्लब संघाला सुरवातीलाच बाबुराव चांदेरे संघाचे आक्रमण थोपविणे व बचाव भेदने शक्य न झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मद्यंतरालाच बाबुराव चांदेरे संघाकडे 30-8 अशी निर्णायक आघाडी घेतल्याने सामन्यात्यील चुरस निघुन गेली. मद्यंतरानंतर सामन अत्यंत संथ गतीने खेळला गेला. बाबुराव चांदेरे सोशल फौंडशन संघाच्या सिध्दार्थ जाधव व अक्षय जाधव यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला निर्मायक आघाडी मिळवून देत विजयात मोलाचा वाटा उचलला तर निखिल ससार व विकास काळे यांनी चांगल्या पकडी घेत आपल्या संघाचा विजय सुकर केला. विजय क्लबच्या अजिंक्य कापरे व श्री भारती यांनी कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाचा अनुभवि व स्टार खेळाडूंचे आक्रमण व बचाब भेदण्यात अपयश आल्याने विजय मिळवून शकले नाहीत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, क्रीडा उपायुक्त संतोष भोर, क्रीडा अधिकारी सुभाष पुरी, नगरसेवक बाबुराव चांदेरे, दिपक मानकर, किरण दगडे, वासंती जाधव, अल्पना वरपे, अमोल बालवडकर, पालिकेच्या सहाय्यक क्रीडा अधिकारी किशोरी शिंदे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, उपाकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, खजिनदार योगिराज टकले, व सर्व पदाधिकारी आणि असोशिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!