नरसीफाटा: ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल शाळेची जिल्हा स्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांची लूट


14 खेळाडूंची राज्य पातळीसाठी निवड

नरसीफाटा दि.22, वार्ताहर- दि. 21 रोजी पार पडलेल्या जिल्हा स्तरीय हौशी थलेटिक्स संघटना नांदेड तसेच महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन पूणे अंतर्गत 10 ते 14 वयोगटासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ग्रीन व्हॅली इंटरनॅशनलच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून 23 पदके प्राप्त केली. एकूण पदकापैकी 12 सुवर्णपदक, 6 रौप्य पदक, 5 कास्य पदक मिळविले, त्यापैकी 14 विदयार्थ्यांनी राज्यपातळीवर पात्र होण्याचा मान मिळवला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत असून शाळेचे विद्यमान सचिव कुमूदकांत गंगदासजी पटेल सर यांच्या हस्ते पदके देवून सत्कार करण्यात आला व तसेच प्रशिक्षक द्रोणाचार्य विजय गव्हाणे व अनुसया चित्तरवाड यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
पदक प्राप्त सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांत कांचन कदम, संजुश्री जवादवार, संजुला जवादवार, मिसबाह गोनारकर, चिंतामनी कत्रुवार, शिवम कापसीकर, वेदांत राखे, गोविंद हंबर्डे, गंगा शेटकर, पियुषा गोटमवाड, श्रेया वाघमारे, अबुझर शेख, अनुष्का कवटिकवार, सृष्टी कदम, धनश्री कोंडावार, आकांक्षा पुय्यड, श्रीनिधी पत्तेवार, तनवी शिंदे आदींचा सहभाग आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!