गंगाखेड: लाखो रूपयांचे मोबाईल चोरणारी टोळी पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे काही तासांत जेरबंद


गंगाखेड स्थागुअ विभागाची दबंग कामगिरी


पूर्णा दि.22, तालुका प्रतिनिधी- परभणी जिल्हयातील गंगाखेड येथे गुरुवारी दि.20 रोजी झालेल्या मोबाईलचोरी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.
गंगाखेड येथील कृष्णा मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस ही मोबाईल शॉपी गुरुवारी दि.20 रोजी रात्री चोरट्यांनी फोडून 12 ते 13 लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप लांबविले. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात सुनील तुकाराम अय्या यांनी फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, किशोर चव्हाण, राजेश आगाशे, संजय शेळके यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मोरे यांनी एक पथक सिल्लोडकडे रवाना करून तीन आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला.
यापूर्वीच्या गुन्ह्यातील वाहन वापरल्याचा संशय
गंगाखेड येथे गेल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करतानाच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका चोरट्याची हालचाल व शरीरयष्टीवरून तो अकबर ऊर्फ चोरबा हाच असल्याची खात्री पीआय मोरे यांना झाली. या चोरट्यांनी परभणी शहरातील नानलपेठ व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले होते व त्यास ताब्यात घेण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे हा चोरटा स्वतःची कार (एमएच 04 – एफए 8146) वापरत असल्याचेही मागील गुन्ह्यातून सिद्ध झाले होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!