नांदेडच्या महापौर, उपमहापौरांना आणखी तीन महिने मुदतवाढ

  • निवडणुका पुढे ढकलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, दि.२३: नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकांसाठी पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यास व या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

आधीच्या महापौर व उपमहापौरांच्या अडीच वर्षातील शिल्लक अकरा महिन्यांच्या कार्यकाळासाठी कॉंग्रेसच्या दीक्षा धबाले यांची गेल्या १ जून २०१९ रोजी महापौर पदावर निवड झाली होती. त्यानंतर २४ जून २०१९ रोजी सतीश देशमुख तरोडेकर यांची निवड झाली. या दोन्ही पदांच्या अडीच वर्षाचा पदावधी १ मे २०२० रोजी संपुष्टात आला. परंतु कोरोना विषाणुमुळे राज्यात उद्भभवलेल्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीमुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने महापौर/ उपमहापौर यांच्या निवडणुका कोविड-19 च्या संक्रमणामुळे 3 महिने पुढे ढकलणे व विद्यमान महापौर/उपमहापौरांना मुदतवाढ देणे यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.

हा अध्यादेश दि.२७ एप्रिल २०२० पासून 3 महिन्यांच्या म्हणजेच दि.२७ जुलै २०२० पर्यंत लागू असल्याने ती मुदतवाढ संपत होती. अद्यापही राज्यामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव कायम असल्याने, महापौर निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने या अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ पुढील 3 महिन्यांसाठी वाढविण्यासाठी अध्यादेशात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!