नांदेडकरांना मोफत अँटीजेन टेस्टची संधी!


नांदेड: बाधिताच्या संपर्कात आलेला कोणताही व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना टेस्ट करून घेऊ शकतो. या टेस्टचा अहवाल एका तासाच्या आत मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०० अँटीजेन टेस्ट पूर्ण झाल्या असून आणखी ५ हजार टेस्टिंग किट उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशी लक्षणे असतील किंवा कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय असेल तर प्रत्येकाने जवळच्या डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्याने अँटीजेन टेस्ट करता येईल. ही टेस्ट RTPCR टेस्टला एक पर्याय आहे. अँटीजेन टेस्ट करून चिंतामुक्त व्हावे. स्वतःची काळजी घ्यावी आणि इतरांनाही चिंतामुक्त ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!