नांदेड: महापौर, उपमहापौरांची निवडणूक लांबणीवर!

तीन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत निवड टळली

येत्या 30 एप्रिल रोजी संपतोय विद्यमान कार्यकाळ

मुंबई, दि.२७: नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक कोविडच्या संक्रमणामुळे ३ महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. येत्या 30 एप्रिल 2020 रोजी विद्यमान पदाधिका-यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु राज्यात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
यासंदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल. या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी तरतुदीनुसार अडीच वर्षे आहे. नवीन महापौरांना अडीच वर्षातील उर्वरित कालावधी मिळणार आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!