तेलंगणात जाणाऱ्या आणखी ३० जणांना नांदेड जिल्ह्यात रोखले!

मुक्रमाबादहून लातूरला परत पाठवले

पायी गाव गाठण्याचा केला प्रयत्न

देगलूर (वार्ताहर), दि.२६: तेलंगणात जाणाऱ्या आणखी ३० तरुणींना शनिवारी नांदेड जिल्ह्यात ताब्यात घेऊन लातूर जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हे सर्वजण लातूर येथून तेलंगणाकडे जाण्यासाठी पायीच निघाले होते. मुक्रमाबाद पोलिसांनी टेम्पोमध्ये बसवून या सर्वांना लातूरकडे परत पाठविले आणि तेथील जिल्हा प्रशासनाला त्याची कल्पना दिली.

लातुर येथे कृषी कंपनीच्या मार्केटींग व्यवस्थापन पदविकेसाठी प्रशिक्षण घेणारे तेलगंणातील ३० तरुण-तरुणी अडकून पडले होते. जवळचे पैसे संपले आणि लॉक डाऊनचा त्रास असह्य होत असल्याने त्यांनी घर गाठण्याचे ठरविले. रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्याने भर उन्हात आडमार्गे पायी चालत, मिळेल त्या वाहनाने ते निघाले. सीमावर्ती भागात मदनूर चेकपोस्टवर याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी या ३० जणांना देगलूर पोलिसांनी ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलिसांच्या स्वाधीन दिले.

यानंतर मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी या तरुणांना आयशर टेम्पोने परत पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून तेथील प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोना महामारी प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनापुढे एक संकटच उभे राहिले आहे. याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे वैद्यकीय विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून तर संचारबंदीचे अंमलबजावणी काटेकोरपणे होत काराना पिषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध क्षेत्रातील संबंधित विभाग काही कालावधीसाठी राज्य शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी चौकशी करुण या तरुणांना एका वाहनातून पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून देण्यात आले. लॉकडाऊनमुळे आता आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आमची उपासमार होत आहे. तरी प्रशासनाने आमची राहण्याची व जेवण्याची सोय करावी. अन्यथा आम्हाला तेलंगणा जाण्याची परवानगी द्यावी, असे प्रशिक्षण घेणाऱ्या तरूणांनी सांगितले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!