मुखेड : शिक्षक मित्र मंडळाच्या वतीने निराधार कुटुंबास अन्नधान्याचे घरपोच वाटप


मुखेड दि. 12 एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना रोगाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या काळात गोरगरिब जनतेची होत असलेली उपासमार लक्षात घेऊन व नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक मित्र मंडळ व हम साथ साथ है ग्रुपच्या वतीने निराधार कुटुंबास दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अन्नधान्य घरपोच वाटप करण्यात येत आहे. तसेच याच समूहाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी 114 व्यक्तींना घरपोच जेवणाच्या डब्याची सोय करण्यात आली आहे .
संपूर्ण देशभर सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे गोरगरीब जनता ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर व अडकलेले लोक यांचे जगणे कठीण झाले आहे. प्रत्येक जण सरकार कडून मदतीची अपेक्षा करत आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना शिक्षक मित्र मंडळ व हम साथ साथ ग्रुपच्या वतीने दररोज 100 ते 150 लोकांना पोळीभाजी डबा पुरविण्याचे काम चालू आहे. तसेच अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या निराधार कुटुंबास दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. एकुण 43 कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला आहे. आपल्या परिसरात आणखी कोणी गरजूंना जेवणाच्या डब्याची गरज असेल तर त्वरित शिक्षक मित्र मंडळ व हम साथ साथ है ग्रुप लागले कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे. अशा गरजू लोकांना आवश्यक तेथे डब्याची सोय करण्यात येईल. या उपक्रमामुळे अनेक गरजू लोकांचा जगण्याचा प्रश्न थोड्या काळापुरता का होईना मार्गी लागला आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!