लोह्यात मांस विक्रीचा “गट व्यावसाय’; टाळेबंदी मध्ये मटण ६०० रु. तर बॉयलर चिकन २०० रु. प्रति किलो

लोहा दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – मांस ..मासे..चिकन विक्रीला टाळेबंदी मध्ये सूट मिळाली त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांना आता आपली खाद्य आवडपूर्ण करता येत परंतु बकरा मटनाचे भाव ६०० रुपये प्रति किलो एवढे वाढले आहेत तर कोरोना मुळे आरंभीच्या काळात चिकन खाणे टाकणाऱ्या आता धडका उठला आहे बॉयलर .चिकन 200 रुपये किलो इतके महाग झाले आहे
कोविड १९ च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली.आता राज्य सरकारने त्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविली आहे . आठवडी बाजार जनावरांचा बाजार बंद असल्या कारणाने शेळी -मेंढी -बकरे मिळेनासे झाले.गावरान कोंबडी दुर्मिळ झाली पर्यायाने मांसाहार करणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे .
लोह्यात मंगळवारी आठवडी बाजार व रविवारी किमान शंभर बकरे व दोन क्विंटल बॉयलर चिकन ची विक्री होते परंतु सध्या संचार बंदी आणि कोरोना मुळे मांस खाणाऱ्या ची संख्या कमी झाली त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या कुरेशी मंडळींनी स्वतंत्र दुकान लावता गट व्यापार सुरु केला आहे
लोह्यातील बकरा मार्केट मध्ये प्रमुख दुकानदाराने एकत्रित येऊन येऊन गट व्यापार सुरू केला आहे त्यात रविवारी , मंगळवारी गटातच बकरे मेंढी शेळी यांसह मांस विकतात नफा तोटा व मेहनत सर्वजण मिळून करतात त्यामुळे पूर्वी या धंद्यात असलेली स्पर्धा कमी झाली शिवाय चढाओढ थांबली.गट मटण विक्रीचा हा व्यवसाय गट बचतगटा सारखा आहे त्यामुळे मार्केट मध्ये हे सर्व व्यावसायिक ..”ना नफा .ना तोटा ” तत्वावर व्यापार करताना पण किमान रोजगार मिळावा एवढीच माफक अपेक्षा आहे .शुकुर कुरेशी रमजान कुरेशी, दस्तगिर कुरेशी , वहाब, सतार, गुलाब, रसूल, वजीर, लतीफ अशी प्रमुख कुरेशी मंडळींनी “गट मटण व्यवसाय “सुरू केला आहे तो टाळेबंदी काळात प्रभावी ठरत आहे.

बॉयलर चिकन वधारले; गावरान कोंबडी मिळेना

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात बॉयलर चिकन खाऊ नका ..कोरोना होतोय अशी अफवा पसरली त्यामुळे हा व्यासाय आर्थिक अडचणीत आला होता परंतु टाळेबंदी नंतर मांस विक्री सुरू झाली त्यानंतर बॉयलर चिकन चे भाव वधारले, सध्या मार्केट मध्ये १८० ते २०० रुपये या दराने चिकन विकले जाते आहे. गावरान कोंबडी दुर्मिळ झाली आहे 450 रुपये या दराने जिवंत कोंबडयाचा भाव आहे पण आठवडी बाजार भरत नसल्याने या कोंबड्या आता मिळनेसा झाल्यात त्यामुळे गावरान चिकन वर ताव मारणे सध्यातरी अवघड झाले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!