मुदखेड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुदखेड तालुक्यातील पत्रकार व पेपर वितरक यांना मास्क वाटप

मुदखेड दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रुपेश पाडमुख, पत्रकार सखाराम कुलकर्णी, यांचे हस्ते मुदखेड तालुक्यातील पत्रकार व पेपर वितरक यांना मास्क वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील पत्रकार व पेपर वितरक यांची विशेष काळजी घेतली पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी हा उपक्रम जिल्ह्यात राबवित आहेत . यांच्यात एक भाग म्हणून मुदखेड येथे मास्क वाटप करण्यात आले .
यावेळी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, उपनिरीक्षक बळीराम राठोड, मंडळ अधिकारी हयुम पठाण, तलाठी मगरे, तहसील चे कुलकर्णी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर डांगे, जेष्ठ पत्रकार मनोज कमटे, ईश्वर पिन्नलवार, दिनेश शर्मा, प्रल्हाद मस्के, साहेबराव गागलवाड, अशिष कल्याणे, पेपर वितरक शंकरराव चंद्रे, रामु गुडमलवार,आदींची उपस्थिती होती .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!