उमरी : कार्ला येथे तीस गरीब गरजु कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप


उमरी दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – देशात लांकडाऊन करण्यात आल्याने गोरगरीब मजुरदार वरची उपासमारी होत असुन उमरी तालुक्यातील कार्ला येथील माजी सरपंच दिगांबरराव पवळे व युवक कांग्रेसचे शंकरराव पवळे यांनी गावातील तीस गरीब गरजु कूटुबांना वीस दिवस पुरेल एवढे अन्नधान्य तहसीलदार माधवराव बोथीकर , गटविकास आधिकारी अमोलकुमार अंदेलवार ,पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे ,पंजाबराव पवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सिधी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय आधिकारी डॉ . कस्तुरे , तलाठी हराळ ,यादवराव पवळे ,पंजाबराव पवळे , तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव .पवळे ,राशन दुकानदार सत्तार खां पठाण ,शुभम पांचाळ आदी यावेळी उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!