उमरी: हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड ; ३६० लिटर हातभट्टी दारु जप्त

उमरी दि. १२ एप्रिल, तालुका प्रतिनिधी – सध्या कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे देशी दारुची चढया भावाने विक्री होत असुन उमरी तालुक्यात गुळ व रसायन मिश्रीत ३६० लिटर दारु जप्त करुन तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सदरील घटना ११ रोजी फुलसिंगनगर येथे दोन ठिकाणी तर १२ एप्रील रोजी वरधडा येथे एक ठिकाणी अशी तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या ,
सध्या लॉक डाऊन मुळे दारुची दुकाने बंद असुन ग्रामीण भागातील वरधडा , येथे २०० लिटर ,फुलसिंगनगर येथे १०० लिटर ,फुलसिंगनगर येथे दुसऱ्या ठिकाणी शंभर लिटर आशी एकुण ४०० लिटर अशी ऐकून ८ हजार रु ची हातभट्टी दारु उमरीचे पोलीस निरीक्षक यांनी धाड टाकून विना परवाना हातभट्टीची चोरटी विक्री करीत असताना विनायक पवार वरधडा २०० लिटर , भोजराम राठोडयांच्या ताब्यातील १०० लिटर तर परसराम राठोड यांच्या कडील ६० लिटर असे एकुण ३६० लिटर दारु जप्त करुन हातभट्टी तयार करण्याचे साहित्य जप्त करुन तिघांना ताब्यात घेऊन उमरी स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .आहे . तपास पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे.हे करीत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!