हदगाव : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरात साजरी करावी -भिम टायगर सेनेचे आवाहन

हदगाव दि. १२ एप्रिल तालुका प्रतिनिधी- सध्या कोरोना विषाणूने भारतात थैमान घातले असुन या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे महाराष्ट्र राज्यात रुग्णाची संख्या बाराशे च्या वर पोहोंचली आहे . केंद्र सरकार व राज्य सरकार या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन केलेला आहे राज्य शासनाला आपण कुतुबासह घरी राहुन सहकार्य करणे आणि संभाव्य रोगापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आपण घरी राहूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन तालुक्यातील जनतेला भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केले आहे.
एके ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी सर्व प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे माझ्या रक्ताचा थेंब भारतासाठी वाहीन म्हणून राज्यघटनेची सुरवात त्यांनी आम्ही भारताचे लोक म्हणून सुरवात केली मला डोक्यावर घेऊ नका माझा जयजयकार करण्यापेक्षा मला डोक्यात घ्या असे त्यांनी सांगितले म्हणून आपण सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले.
आज ची परिस्थिती लक्षात घेऊन आपण सर्वांनी आपल्या घरात बसून त्यांना अभिवाद करावे कोरोना विषाणूला आपण सर्वांनी एकत्र मिळून हरवायचे आपण फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घरा बाहेर पडावे घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा आपले हात स्वच्छ साबणाने धुवावे शिकतांना तोंडाला रुमाल लाऊन शिकावे सर्दी किवा ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काळजी करू नये परंतु काळजी घ्यावी अफवेवर विश्वास ठेऊ नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!