माहूर : लेकीचे हात पिवळे कारण्याअगोदरच जगाचा निरोप ; दहेगाव (साकुर)च्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


माहूर दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील दहेगाव (साकुर) येथील कोरडवाहू नवाटी धारकशेतकरी मारोती नागोराव आढाव वय 42 याने माळावरील शेतीची नापिकी व बँकांच्या कर्ज व मुलीच्या विवाह करीता पैसे नसल्याने ऐन लॉक डाऊनचे काळात आपल्या राहते घरीच शनिवारी दि, ११ रोजीरात्री नऊच्या सुमारास विष प्राशन केले . परिवाराला मारोती ने विष प्राशन केल्याचे कळतात तात्काळ वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले परंतु मारुतीच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी माहूर ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मारुती वर विषाचा प्रभाव जास्त झाल्याने रस्त्यातच प्राण गेल्यागत झालेल्या मारुतीस माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघमारे यांनी तपासाअंती मृत घोषित करून माहूर पोलीस स्टेशनला कळवले.
बीट जमादार बी. एन. जाधव यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली व पोलीस डायरीला अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन शवविच्छेदना अंती मारुतीचे शरीर पुढील क्रियेसाठी परिवाराचे सुपूर्त केले. व पुढील तपास बीट जमादार बी. एन .जाधव हे करीत आहेत.
आज मारोतीच्या दुर्दैवी आत्महत्येने पत्नी अनुसया मारुती आढाव 37 वर्षे,मुलगा विशाल 22 वर्षे,मुलगी अरुणा 21वर्षे व लहान मुलगा शिवम 19 वर्षे असा पत्नी व तीन पत्त्यांचा परिवार नापिकी कर्जबाजारीपणा व मुलींच्या विवाहाच्या विवंचनेत उघड्यावर आला असल्याने आढाव परिवार व मौजे दहेगाव-साकुर वर शोककळा तर परिसरात लेकीचे हात पिवळे करण्याआधीच बापानेच जगाचा निरोप घेतल्याच्या हृदयद्रवक घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!