हदगांव येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन


हदगाव दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी — कोरोना महामारीच्या भयानक संकटात रक्तपेढींना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हदगाव येथील द्रोणागिरी मित्र मंडळ व उपजिल्हा रुग्णालय हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. १३ रोजी सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात निरोगी व्यक्तींनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन शहरातील सर्व डॉक्टरांच्यावतीने डॉ. संजय पवार यांनी केले आहे.
नुकतेच जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी व अन्य रक्तपेढी यांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हदगाव येथील द्रोणागिरी मित्र मंडळ व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरच्या हदगांव शाखेचे भक्त मंडळ, मारवाडी युवा मंच, संभाजी ब्रिगेड, बसव ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जय देवा भक्त मंडळ, वासवी क्लब हदगाव, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शिवा संघटना यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
या रक्तदान शिबिरातील रक्त संकलित करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी विष्णुपूरी नांदेड येथील डॉक्टरांची टीम येणार आहे.
नगरपालिके लगत असलेल्या जिजाऊ नगर येथील मैदानावर हे रक्तदान शिबिर होणार असून या शिबिराचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार जिवराज डापकर, नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विजय येरावाड, डॉ. व्ही.जी. ढगे ईत्यादींच्या ऊपस्थीतीत करण्यात येणार आहे. शहरातील अठरा ते साठ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी या शिबिरात येवून रक्तदान करावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय हदगांवचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकटराव ढगे यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!