” भीम जयंती घरीच साजरी करावी ” — नगराध्यक्ष शिरशेटवार

देगलुर दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट अशी संचारबंदी आहे या संचारबंदीत नियमाचे कोणीही उल्लंघन न करता घरात राहूनच मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आव्हान नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी केले आहे.
आपल्या एकत्र जमावामुळे कोरोनाचा धोका अधिक उद्भवू शकतो त्याचे परिणाम आपल्या सह संपूर्ण शहर पर्यायाने राज्याला भोगावे लागतात ती परिस्थिती निर्माण होण्याआधी आपल्या देशाच्या हितासाठी आणि कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी भीम जयंती दिनी कोणत्याही समाज बांधवांनी तथा तमाम भीम अनुयायांनी घराच्या बाहेर पडू नये .
विशेष म्हणजे देशात उद्भवलेल्या आकस्मिक संकटामुळे आपणास एकजुटीने लढण्याची नितांत गरज आहे , जात -पात पंथ व पक्षभेद बाजूला सारून एकजुटीने या संकटात सामना करण्याची ही वेळ आहे. संपूर्ण शहरवासीयांनी गेल्या 18 दिवसापासून प्रशासनास मोठ्या एकजुटीने प्रशासनास सहकार्य करीत आहात मात्र राज्यात दिवसागणिक परिस्थिती गंभीर बनत चालली आहे या परिस्थितीचे गांभीर्य पाहून मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी घरातच राहून साधेपणाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष यांनी केले .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!