मुदखेड : ना. अशोकराव चव्हाण यांच्या कडुन बारड सर्कल मध्ये धान्य वाटप

मुदखेड दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वतीने मुदखेड तालुक्यातील गोरगरीब लोकांना अन्नधान्य पाठविले असून गावनिहाय वाटप चालू आहे, दि.११ रोजी बारड, पांढरवाडी, तिरकसवाडी येथे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर मुदखेड काँग्रेस कमिटी अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर, पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे, पंचायत समिती उपसभापती आनंदराव गादीलवाड, बारडचे उत्तमराव लोमटे, प्रताप देशमुख,श्रीराम कोरे, बारड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन खंडागळे, ग्रामविस्तार अधिकारी श्रीवास्तव, कोपन दुकानदार प्रल्हाद जोंधळे, सरपंच रामेश्वर जंगीलवाड, उपसरपंच गोविंदराव नव्हाते, राम गवंडेवाड, व तिरकसवाडी येथील सरपंच, उपसरपंच, नागेली येथील सरपंच, उपसरपंच, दादाराव पुयड, विश्वबर पुयड, तिन्ही गांवातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!