किनवट : कडधान्य खरेदी केंद्राला मुदतवाढ द्या – आ. केराम


किनवट दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळावी, यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ देवून खरेदी केंद्र सुरू ठेवावे,अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात आ. केराम यांनी म्हटले आहे की, किनवट व माहूर तालुक्यात आधारभूत किमतीच्या धर्तीवर आदिवासी विकास महामंडळातर्फे कडधान्य खरेदी केंद्र सुरू आहे.केंद्रावर सध्या हरभरा व तूर खरेदी सुरू आहे. तथापि, किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, मक्का आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती. चालू वर्षात अंदाजे १०० टनापेक्षाही जास्त मक्क्याचे उत्पन्न असल्याचा अंदाज आहे. परंतु सद्यस्थितीत ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल अद्यापही पोहोचू शकला नाही. त्यातच पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादीत मालास हमीभाव मिळण्यासाठी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांवर मक्का व मालदांडी ज्वारी खरेदी करण्यास मुदतवाढ देवून खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!