किनवट : रेती उत्खनन करणारे २ ट्रॅक्टर जप्त मात्र आरोपी फरार


किनवट दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – पैनगंगा अभयारण्य खरबी वनपरिक्षेत्रातील एरंड बीट कक्ष क्र.६०७ मधील राखीव नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन विनापरवाना वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर्स खरबी, कोरटा व बोधडी वनविभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी ( दि.१०) रोजी पकडले. धरपकड दरम्यान दोघे आरोपी फरार झाले.
पांढरकवडा वन्यजीव विभागातंर्गत पैनगंगा अभयारण्य खरबी वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या कार्यालयाच्या कार्यकक्षेतील गाडी वर्तूळ अंतर्गत एरंड बीट असून, त्यातील कक्ष क्र.६०७ या पात्रातून रेतीची चोरी होत असल्याची खबर खरबी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी ओ.बी.पेंदोर यांना मिळाली. त्यांनी कोरटा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.पांडे, नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गतच्या बोधडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांना पाचारण केले. या तीनही परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दि. १० रोजी रात्री सदर नदीपात्रात जाऊन अवैध उत्खनन करणारे २ ट्रॅक्टर ताब्यात घेतले.पथकाला पाहून रेती तस्करांनी पोबारा केला. दोन ट्रॅक्टरवर दहा ते बारा मजूर असावेत, त्यांच्यासह ट्रॅक्टरचालकांनीही अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.याप्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ कलम २७, २९, ५०, ५१, भा.अ.नि.१९२७ चे कलम २६ (१), ए.डी.जी.४२(१), महाराष्ट्र वननियम २०१४ चे नियम ३१,८२ व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस प्रतिबंध अधिनियम १९८४ च्या कलम ३ प्रमाणे गुन्ह्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्या अंतर्गत २ ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले. बोधडी येथील मारोती तोटरे व लक्ष्मीकांत केंद्रे यांच्याविरुद्ध सदर गुन्ह्याच्या नोंदी असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदोर यांनी दिली.सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी वनरक्षक एस.एस,देवडे, वनरक्षक ए.बी.घायवट, वनरक्षक एम.के.पठाण, वनरक्षक एन.डी.मागीरवाड, वनरक्षक आर.एल.यादव यांच्यासह बोधडी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!