कंधार शहरात शिव भोजन थाळीचे आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कंधार दि.११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी -कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी कंधार -लोह्याचे आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते “शिव भोजन” थाळीचे फीत कापुन शुभारंभ करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, पोलीस निरीक्षक विकास जाधव उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या या शिव भोजन थाळी चा उद्देश म्हणजे तळागाळातील गोरगरीब, गरजू, कामगार, शेतमजूर, भटके ,यांना अल्प दरामध्ये जेवण मिळावे हा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रासह देशभर लॉक डाउन असल्यामुळे ज्या गोरगरीब गरजू लोकांचे हातावर पोट आहे अशा गरजू लोकांना या शिव भोजन थाळी चा अल्प दरामध्ये लाभ मिळणार आहे. लॉक डाऊन काळात ही गोरगरीब लोकांच्या जेवणाची सुलभ सोय व्हावी. या उद्देशाने प्रत्येकी पाच रुपये या अल्पदराने शिव भोजन थाळीचे वाटप करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने कोरोना च्या पार्शवभूमीवर गोरगरीब गरजू लोकांना शिव भोजन थाळीचा लाभ होणार आहे.
शिव भोजन थाळीचा कंधार तालुक्यातील व शहरातील गरजू लोकांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आ. शिंदे यांनी केले आहे. यावेळी युवा नेते रोहित पाटील शिंदे, शेरू भाई, बंटी गादेकर ,योगेश पाटील नंदनवनकर, बालाजी ईसादकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!