परभणी : कोव्हिड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी स्‍प्रींकलरद्वारे निर्जंतुकीरण कक्षाची निर्मिती


स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांची संकल्पना


परभणी दि. ११ एप्रिल , प्रतिनिधी – परभणी शहर महानगरपालिका शहरातील कोव्हिड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहे. आयुक्‍त रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली कोव्हिड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी एक उपाययोजना म्‍हणून स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांनी निर्जंतुकीकरण कक्ष तयार केला आहे. सदर कक्ष महापालिकेच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारात ठेवण्‍यात आलेले असून या कक्षामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या अंगावर कक्षाच्‍या वरील भागात लावलेले स्‍प्रींकलरद्वारे निर्जंतुकीरणाचे औषध स्‍प्रे केल्‍याजाते. ज्‍यामुळे आतील व्‍यक्‍ती काही प्रमाणात का होईना निर्जंतुक होऊन त्‍या कक्षा बाहेर येतो. यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यास मदत होणार आहे. याकक्षाच्‍या दोन्‍ही बाजू कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठीच्‍या प्राथमीक उपाययोजनांची माहिती देणारे बॅनर्स /माहिती फलक लावण्‍यात आले आहे.
याचे उद्धाटन आयुक्‍त रमेश पवार यांचे हस्‍तेकरण्यात आले, याप्रसंगी रवी सोनकांबळे, उपायुक्‍त जायभाये, सहायक आयुक्‍त अल्‍केश देशमुख, शहर अभियंता वसीम पठाण, स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा आदींची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!