आ. मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी 100 क्विंटल तांदूळ जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

(छायाचित्र – करणसिंह बैस)

नविन नांदेड दि. ११ एप्रिल , प्रतिनिधी – कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून सावरण्यासाठी गोरगरीब जनतेसाठी आ. मोहनराव हंबर्डे यांनी स्व खर्चातून 100 क्विंटल तांदूळ जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांना सुपूर्द केले. यावेळी आमदार अमर राजूरकर यांची उपस्थिती होती.
शासनाच्यावतीने गरीब जनतेला अन्नधान्य मिळावे म्हणून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.कार्डधारकांना शासनाने शिधा पुरवठा करणे सुरू केले आहे. याव्यतिरिक्त ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत अशा गरीब जनतेची उपासमार होऊ नये या उद्देशाने आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या स्वखर्चातून शनिवारी 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना 100 क्विंटल तांदूळ सुपूर्त केले. यावेळी धारोजीदादा हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे, जयसिंगराव हंबर्डे, राहुल हंबर्डे, नितीन पाटील, राजू मोरे, प्रथमेश पावडे, शिवाजीराव लुटे,मधुकर हंबर्डे, रमेश गोडबोले, पिंटू पाटील शिंदे, ए. एन. नावंदीकर, तिरुपती कोल्हे प्रकाश दिपके यांची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!