हदगाव : पावणे दोन लाख लोकांना सोमवार पासून तांदूळाचे वाटप -नायब तहसीलदार येरावाड


हदगाव दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – हदगाव तालुक्यातील १ लाख ७५ हजार नागरिकांना प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे ८,७७८ क्विंटल तांदूळ सोमवार पासून तालुक्यात वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विजय येरावाड यांनी प्रजावाणीशी बोलताना सांगितले.
हदगाव तालुक्यात १७३ रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदारांकडून अतिरिक्त धान्य द्वार पोच योजने अंतर्गत करण्यात येत आहे. रास्त भाव दुकानदारा मार्फत आतापर्यंत ७०% वाटप करण्यात आले, उर्वरित ३०% धान्य वितरण दोन दिवसात करण्यात येणार. ज्या दुकानदाराचे धान्य पंतप्रधान मोफत धान्य योजना अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब या शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत धान्य वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली.
हदगाव तालुक्यात दोन्ही योजनेचे १ लाख ७५ हजार ५५७ व्यक्तींना ८७७८ क्विंटल तांदूळ वाटप होणार असल्याची माहिती संजय कुर्तडीकर, संजीव कुमार राठोड यांनी दिली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!