मुखेड : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने धान्य वाटप सहा जनजागृती


मुखेड दि. 11 एप्रिल, तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनने अनेकांचे खायचे वांदे झाले आहेत. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुखेडच्या वतीने गरजवंताना व्यक्तींना धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे.
शहरातील गरजवंत व्यक्तींची नावे काढुन त्याच्या घरापर्यंत जाऊन त्यांना धान्य किट देत त्यांना कोरोना विषाणुबाबत जनजागृती करण्यात आली व नागरिकांना बाहेर न पडता घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुखेडचे शाखाधिकारी सुनिलकुमार मदीराजु, प्रमित गजभिये, मंगेश सोनटक्के,रौनक तिवारी यांच्यासह नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, कृष्णा देबडवार,नागेश कालानी, ज्ञानेश्वर डोईजड, महेश मुक्कावार,योगेश पाळेकर आदी उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!