देगलूरात नंदकिशोर शाखावार यांचा मदतीचा हात ; उद्या 325 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

देगलूर दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – लाॅकडाउन च्या काळात हाताला काम नाही.. आणि खायला अन्न नाही… अशा कात्रीत अडकलेल्या गोरगरीब 325 गरजू कुटुंबांना शहरातील दानशूर व्यक्ती नंदकिशोर शाखावार यांच्याकडून रविवार दि.12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देगाव नाका येथील ” लक्ष्मी नरसिंह ” निवासस्थानात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. यावेळी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळंगे यांची उपस्थिती राहणार आहे.
शहर व परिसरात कोणत्याही संकटकाळात अथवा सामाजिक उपक्रमात नेहमीच मदती ला धावून येणारे व्यक्ती म्हणून नंदकिशोर लक्ष्मणराव शाखावार यांचे नाव अग्रगण्य आहे. दिवसागणिक कोरोना च्या व्हायरस आपले हात पसरत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही परिणामी अनेक मोल मजूर , हातावर पोट असणाऱ्या ची हाताला काम नाही याचे गांभीर्य ओळखून शहरातील महात्मा फुले नगर देगाव रोड , लाईन गल्ली , मुकुंदनगर , जयभीमनगर , पेठ अमरापुर गल्ली , व टेकाळे गल्लीतील काही भागातील 325 अत्यंत गरजू कुटुंबांना नंदकिशोर शाखावार यांच्याकडून
प्रत्येकी 10 किलो तांदूळ , 1 किलो तूर दाळ, सोयाबीन गोडतेल 1 पॉकेट , 200 ग्राम मिरची पॉकेट , 100 ग्राम हळद पॉकेट , मिठाचा एक पुडा , 100 ग्राम जीरा पॉकेट, एक किलोचा निरमा पुडा , आग पेटीचा एक पुडा, साबणाची एक जोडी अशा जीवनावश्यक वस्तूंची कापडी पिशवी मध्ये उपरोक्त शिधा वाटप केले जाणार आहे विशेष म्हणजे त्या पिशवीवर ” बेटी बचाओ बेटी पढाओ असे शीर्षक लिहिलेले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना देखील यानिमित्ताने एक वेगळा संदेश जाईल. जीवनावश्यक वस्तूंचे हे किट रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देगाव नाका येथील “लक्ष्मीनरसिंह ” निवासस्थानात उपजिल्हाधिकारी शक्ती कदम , तहसीलदार अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे. नंदकिशोर शाखावार यांच्या दातृत्वामुळे अनेक गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे अशा स्तुत्य उपक्रमाचा अनेक दानशूरांनी दखल घेऊन मदतीचा हात पुढे करावे अशी रास्त अपेक्षा गरजवंतातून व्यक्त केली जात आहे
विशेष म्हणजे वाटपाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक गरजू व्यक्तींना एक टोकन दिले जाणार आहे ते टोकन घेऊन सोशल डिस्टन्स नुसारच ते किट वाटप केले जाणार आहे जेणेकरून गर्दी केव्हा रांगेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे विशेष होय

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!