परभणी ; भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांनी नियम मोडल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हे


परभणी दि. ११ एप्रिल , प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी नागरीकांनी गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळाणे व जिवनावश्‍यक वस्‍तुच्‍या खरेदीसाठी घराबाहेर पडल्‍यास तोंडावर मास्‍क किंवा रुमाल बांधने व सोशलडिस्‍टन्‍सचे पालन करणे आवश्‍यक आहे. भाजीपाला व जिवनावश्‍यक वस्‍तुंची खरेदी करण्‍यासाठी नागरीक घराबाहेर पडून गर्दी करत असल्‍यामुळे परभणी शहर महानगरपालिकेने शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते यांना मुख्‍यबाजारपेठेत व रस्‍त्त्‍यांवर एकाच ठिकाणी बसून व एकाच ठिकाणी हातगाडा/वाहन उभे करून भाजीपाला विक्री न करता शहरात फिरून भाजीपाला विक्री करण्‍याचे व नागरीकांनी फेरीवाला दारात आल्‍यानंतरच भाजीपाला घेण्‍याचे आवाहन केले होते. परंतू अद्यापही शहरातील मुख्‍याबाजार पेठेत भाजीपाला विक्रीसाठी हातगाड्यांची व नागरीकांची गर्दी होत असून नागरीकांमार्फत सोशलडिस्‍टन्‍सचे पालन होतांना दिसून येत नाही.
त्‍यामुळे भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांनी शहरातील मुख्‍य बाजारपेठेत एकाच ठिकाणी जमिनीवर बसून किंवा हातगाडा उभा करून भाजीपाला विक्री करतांना आढळून आल्‍यास त्‍यांच्‍यावर साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नूसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्‍याचे समजून फौजदारी गुन्‍हा दाखल करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे भाजीपाला विक्रेते यांनी शहरात फिरूनच भाजीपाला विक्री करावा किवं विविध परिसरातील ओपन स्‍पेस मध्‍ये सोशलडिस्‍टन्‍सचे पालन करत भाजीपाला विक्री करून आपल्‍याला व आपल्‍या ग्राहकांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्‍यापासून वाचवावे, असे आवाहन आयुक्‍त रमेश पवार यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!