कंधार : जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे साधला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी संवाद


कंधारचा कापुस नांदेड, नायगावला विक्रीस नेण्याचे केले आवाहन


कंधार दि.११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कोरोनाशी निगडित विविध विषयांवर तसेच अन्नधान्य वितरणाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाध साधला. याच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कंधार तालुक्यासह ईतर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत कापूस विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीबाबत सविस्तर सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी करुन कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला कापूस विक्रीसाठी नांदेड अथवा नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा असे सांगितले. असल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी दर्जेदार कापुसच (एफ ए क्यू) विक्रीसाठी आनावा. कापूस खरेदी केंद्राना गठाण वाहतूक, सरकी वाहतूक या व इतर अनुषंगिक बाबीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल कापूस खरेदीसाठी संकलन केंद्रानी ईतर कुठलीही सबब पुढे करू नये अशा सूचनाही दिल्या. खरीप हंगामातील बहुतांश कापसाची विक्री झाली असून फार तुरळक प्रमाणात वेचणीसाठी व साठवलेला कापूस शिल्लक असून यातील दर्जेदार कापूस संबंधित संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांशी कंधारच्या उपविभागीय कार्यालयात डिओ कॉन्फरन्स सुरू असताना कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगांवकर, तहसिलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक निबंधक जी.आर.कौरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पी.डी.वंजे यांच्यासह नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार ताडेवाड यांची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!