मांजरम : जि. प . शाळांना शालेय पोषण आहार वाटप ; खाजगी शाळा शालेय पोषण आहारापासून वंचित


विकास भुरे


मांजरम दि. ११ एप्रिल , वार्ताहर – जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हा आहार वाटप करण्यात आला असला तरी खाजगी शाळेतील शालेय पोषण आहार केंव्हा वाटप करणार असा प्रश्न विद्यार्थी व पालक करीत आहेत.
कोरोना महामारी मुळे १७ मार्च पासून शाळेत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम थांबले होते. तांदूळ, मसूरदाळ, हरभरा,वटणा व चवळी आदी साहित्य शाळेत देण्यात येते . मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांचा एप्रिल व जुन महिन्यातील शालेय पोषण आहार शाळेत पाठविण्यात आला होता. शाळेतील उपलब्ध पोषण आहाराचे वाटप बहुतांश जिल्हा परिषद शाळेत करण्यात येत आहे.जिल्हा परिषद शाळे प्रमाणे खाजगी शाळेत देखील पोषण आहार पुरवठा करण्यात आला आहे. खाजगी शाळेनेही आपल्या कडे शिल्लक असलेला पोषण आहार केंव्हा वाटप करणार असा प्रश्न पालक व विद्यार्थी विचारत आहेत. कोरोना मुळे हाताला काम नसलेल्या कुटुंबाला या अन्न धान्याचा मोठा आधार होणार आहे.
मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दि.११ व,१२ एप्रिल रोजी शिक्षक व शालीय व्यवस्थापन समितीने लाॅक डाऊनचा व जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत पहिली ते आठवीच्या ३६३ विद्यार्थ्यांना तांदूळ जवळपास ३५ क्विंटल ,मसुळदाळ २.५० क्विंंटल, हरभरा ३.१९ क्विंटल, वाटाणा ३ क्विंटल,मटकी ३ क्विंटल असा एकंदरीत आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भुजंगराव सोनकांबळे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता केते, उपाध्यक्ष सुभाष शिंदे , पोलिस पाटील जयराज शिंदे व वर्ग शिक्षक यांनी नियोजन करून शालेय पोषण आहाराचे वाटप केले.हनुमान मंदिरा वरील ध्वनीक्षेपनावर वेळ पत्रक जाहीर करून षोषण आहाराचे वाटप केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!