मुखेड : वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कुलकर्णी यांनी दिले ११ हजार रुपये


मुखेड दि. 11 एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना या महामारीचे भयानक संकट उभे असून भारत ही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा फैलाव होत असून देश व राज्यावर आर्थिक संकाटाची चिन्हे दिसून येत आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.
मुखेड तालुक्यातील एका खाजगी संस्थेत अधीक्षक पदावर काम करणारे अरुण भारतराव कुलकर्णी यांनी त्यांच्या 47 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला अकरा हजार रूपयाचा फंड नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांचे कुटुंबीय व मित्र उपस्थित होते. अरुण कुलकर्णी यांनी जमेल त्यांनी जमेल तसे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधिला मदत करण्याची विनंती केली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!