देगलूरातील अंतर्गत रस्ते बंद करणार- नगराध्यक्ष शिरसेटवार


देगलूर दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी व शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहन चालकावर चाप बसविण्यासाठी अंतर्गत रस्ते बंद करण्याचा निर्णय गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी दिली . यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे ,तहसीलदार अरविंद बोळंगे , पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे, मुख्याधिकारी गंगाधर इरलोड , स्वच्छता निरीक्षक मारुती गायकवाड आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी बुधवार दि. ८ एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी व उपाययोजना आखावी अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी शहरातील अंतर्गत रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला असून देगाव नाका व हनुमान चौकात पोलीस चौकी उभारण्यात येईल व अंतर्गत रस्ते शुक्रवारपासून बंद करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार यांनी दिली. या निर्णयामुळे विनाकारण फिरणाऱ्यास चाप बसून कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करण्यात यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!