मुदखेड: कडकडीत बंदीतही दारूचा धंदा तेजीत ; ३८ हजाराची दारु जप्त

गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी मांजरमकर यांची कारवाई

मुदखेड दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – मुदखेड येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केलेली आहे,तरीही शहरात मोठ्या प्रमाणात चोरून छपून बेभाव दारु विक्री चालू होती,या प्रकाराची दखल अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घेतली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी माधव मांजरमकर यांच्या पथकाने दि.८ एप्रिल बुधवार रोजी ३८ हजारांची दारु जप्त करत मोठी कार्यवाही केली असून अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यां मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुदखेड रेल्वे स्टेशन रोडवरील एका घराजवळ विदेशी दारू विक्री होत असल्याची पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा टाकला यात तब्बल ३८ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु सापडली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सर्वत्र दारु विक्री बंद असताना सुध्दा एका घराजवळ पाठीमागील बाजूने विदेशी दारु विक्री चालु होती.या संबंधी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी माधव मांजरमकर यांच्यासह पोलीस उप निरीक्षक राठोड,पोकॅा कदम पठाण,घुगे,तेलंगे,झिकंलवाड,चव्हाण व मुदखेड चे सपोनि बळीराम राठोड,पोहेका उत्तकर,महिला पो.का गोडबोले यांच्या पथकाने चुडेवार यांच्या निवासस्थानी छापा टाकला.यामध्ये एकूण ३८ हजार रुपये किंमतीची विदेश दारु जप्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसामध्ये मुदखेडात विदेशी दारुची परवानगी नसताना विक्री होत होती, त्यावर झालेली ही तिसरी कार्यवाही आहे.या घटनेची फिर्याद सपोनि माधव मांजरमकर यांनी मुदखेड पोलिस स्टेशन येथे नोंदविली असून त्यानुसार मुदखेड ठाण्याचे सपोनि विश्वांभर पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कलम ६५ इ व दारूबंदी कायदा कलम सह भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि बळीराम राठोड हे करीत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!