धर्माबाद : हरितक्रांती कृषी बचत गटाच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप


धर्माबाद दि. ११ एप्रिल तालुका प्रतिनिधी – देशावर व महाराष्ट्रातील जनतेवर जे कोरोनाचे संकट ओढलेल आहे.त्याचा परिणाम सर्वसामान्यावर सर्वाधिक झालेला आहे.या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकजन मदतीस सरसावलेआहेत.तालुक्यातील मौ.रोषणगांव येथील येथील हरितक्रांती कृषी बचत गटाने आपला सामाजिक वसा जोपासत गोदावरी नदीच्या काठी वस्ती करुन राहत असलेले आदिवासी बांधव व गावातील गोरगरिबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
प्रत्येकी पाच कि.तांदूळ, साखर,चहा पती,गोडतेल,मिर्ची ,साबन इत्यादी वस्तुचे वाटप बचतगटाचे अध्यक्ष.नागनाथ माळगे,उपाध्यक्ष वैजनाथ शिवशट्टे, सचिव सिध्देश्वर शिवशट्टे , नागोराव पा रोषणगांवकर,सरपंच सौ.महादाबाई मेडेवार बचतगटाचे सर्व सदस्य याप्रसंगी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन डॉ. गोविंद शिवशट्टे यांनी केले.या स्तुत्य उपक्रमाबद्दल बचतगटाच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!